आमदार दराडे बंधुच्या पुढाकाराने भक्तांसाठी मोफत पंढरपूर दर्शन दिंडी!

आमदार दराडे बंधुच्या पुढाकाराने भक्तांसाठी मोफत पंढरपूर दर्शन दिंडी!


येवला : पुढारी वृत्तसेवा
 घेईन मी जन्म याजसाठीं देवा,तुझी चरणसेवा साधावया॥,हरिनाम कीर्तन संतांचे पुजन । घालुं लोटांगण महाद्वारीं... या अभंगाप्रमाणे आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची महती मोठी आहे.त्यामुळे दर्शनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या सर्व भाविक भक्तांना पंढरपूर येथे मोफत दर्शनासाठी नेण्याची व्यवस्था आमदार दराडे बंधूंच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. इच्छुकांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन कुणाल दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांनी केले आहे.
येवला- लासलगाव परिसरातील संत-महंत,वारकरी,कीर्तनकार, प्रवचनकार,गायनाचार्य,मृदुगाचार्य व सर्व वैष्णवजण विठूभक्तांना कुणाल दराडे फाऊंडेशन,आमदार नरेंद्र दराडे,आमदार किशोर दराडे यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त याही वर्षी पंढरपूर विठ्ठल दर्शन दिंडी आयोजित करण्यात येत आहे.
भाविक-भक्तांना मोफत पंढरपूर येथे दर्शनासाठी घेऊन जाण्यासाठी लयेथील दराडे पेट्रोल पंप येथून बुधवारी, दि.२८ रोजी सकाळी ६ वाजता बसची व्यवस्था करण्यात आली असून देवगडमार्गे पंढरपूरला जाणार आहे.अधिकाधिक भाविकांनी सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार दराडे बंधूनी केले आहे.या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊ इच्छुणाऱ्या भक्तांनी पुढील नियोजनाच्या दृष्टीने 02559 225001,7020865436,7028009010 या क्रमांकावर आपले नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थोडे नवीन जरा जुने