आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल येवला येथील 5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत गरुड झेप



आत्मा मालिक  इंग्लिश मीडियम गुरुकुल येवला येथील 5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत गरुड झेप


येवला : पुढारी वृत्तसेवा

विश्वात्मक जंगली  महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुलाचे अध्यक्ष व संस्थेचे सरचिटणीस   हनुमंतराव भोंगळे  यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथील इ.5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेत सहभाग घेतलेला होता.या परीक्षेत विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे.
संपूर्ण येवला तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी पात्र होण्याचा गौरव आत्मा मालिक गुरुकुलाने पटकावला आहे.
आत्मा मालिक गुरुकुलाचे सातत्यपूर्ण गुणवत्तेचे सलग चौथे वर्ष आहे. इ.5 वीच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांची नावे -     
साईमाणिक संतोष रायजादे                 (59.33%)
आयुष संदीप पवार
(50.67%)
तसेच इ.8 वी मधून येवला ग्रामीण सर्वसाधारण यादीत 
पहिला  क्रमांक पटकावत
 पार्थ विजय महाजन  
       (52.90%)
याने बाजी मारली आहे. तसेच  
भक्ती सतीश जगताप
   (51.67%)
  हिने देखील तिसरा क्रमांक पटकावत येवला ग्रामीण सर्वसाधारण यादीत आपले यश प्राप्त केले आहे.
गुरुकुलाच्या सर्व संबंधित शिक्षकांच्या अपार परिश्रमाची ही फलश्रुती आहे. विद्यार्थी हितदक्ष, अत्यंत सकारात्मक व सद्गुरु कार्यात संपूर्ण समर्पित असे अध्यापक व अध्यापिका वृंद व यशस्वी झालेल्या सर्वच  विद्यार्थ्यांचे प.पू आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादासह सर्व संत मांदियाळी  अध्यक्ष  नंदकुमार सूर्यवंशी  सरचिटणीस हनुमंत भोंगळे  व विश्वस्त वृंद आणि गुरुकुलाचे प्राचार्य यांच्यावतीने मनापासून हार्दिक अभिनंदनन करण्यात आले.
थोडे नवीन जरा जुने