रयत क्रांती संघटनेकडून काँग्रेसच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन....रयत क्रांती संघटनेकडून काँग्रेसच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन....
येवला : पुढारी वृत्तसेवा

 भाजीपाला पिकाच्या दरवाढी विरोधात आंदोलन केल्याबद्दल काँग्रेसच्या विरोधात रयत क्रांती संघटनेकडून आज निषेध आंदोलन करून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
सत्यगाव येथे रयत क्रांती संघटनेचे वाल्मीक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. काँग्रेसच्या वतीने टोमॅटो व भाजीपाल्याचे वाढलेल्या दराच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत असून या आंदोलन करणाऱ्या काँग्रेसचा घोषणाबाजी करून निषेध यावेळी करण्यात आला.तसेच विरोधात घोषणाबाजी करून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. एकतर शेतकऱ्याचा शेतमाला भाव नाही.थोडाफार भाव मिळत असल्याने काँग्रेसने वाढलेल्या भाजीपाला भावा विरोधात आंदोलन छेडले आहे.गेल्या चाळीस वर्षात काँग्रेसने भाजीपाला पिकाचे बाजार भाव वाढून दिले नाही.आता का विरोधात करतात, असा सवाल यावेळी सांगळे यांनी केला.
कधीतरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीचा भाव मिळत असेल तर कोणीही पोटात दुखू देऊ नये. शेतात राबराब रावून पिकवलेल्या अनेक पिकाला घामाचे दामही मिळत नाही,यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन पिचत चालला आहे.याची जाणीव ठेवावी व  शेतमालाच्या भावा संदर्भात बोलणाऱ्यांचे विरोधात आम्ही असेच आंदोलने करू असा इशाराही सांगळे यांनी दिला. यावेळी नवनाथ उगले,श्रीकृष्ण आव्हाड,संतोष पवार,विलास भवर,सूर्यभान आव्हाड,अंकुश्श आव्हाड,समाधान दराडे,सतीष माळी,अंकुश शिंदे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
फोटो
सत्यगाव : काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करताना रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते
थोडे नवीन जरा जुने