देवीचे कोटमगाव सरपंच पदी आशा कोटमे व उपसरपंच पदी मनीषा माळी यांची बिनविरोध निवड
येवला :
तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कोटमगाव देवीच्या ग्रामपंचायतीवर भाजपचे युवा नेते प्रा,नानासाहेब लहरे,जगदंबा देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, सतीश कोटमे, बाबुराव कोटमे, लहानू धांद्रे,गणेश परदेशी,जनार्दन कोटमे,यांच्या स्वाभिमानी विकास पॅनलची एकहाती सत्ता आहे, आवर्तन पद्धतीनुसार सरपंच संध्या कोटमे व उपसरपंच प्रवीण मोरे यांनी राजीनामा दिला, आज झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडणूक ही एकमताने बिनविरोध झाली, यावेळी ग्रामपंचायत सदस्य संध्या कोटमे,प्रवीण मोरे, गणेश कोटमे,प्रतीक्षा लहरे, उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी श्रीमती, शेटे व ग्रामसेवक गणेश रोकडे तलाठी आठवले यांनी कामकाज पाहिले.
या निवडी प्रसंगी दिलीप कोटमे,भारत मगर,भाऊसाहेब माळी,अर्जुन कोटमे, लक्ष्मण सोनवणे,राजेंद्र कोटमे,राजूभाऊ कोटमे,विजय जाधव,बाबासाहेब परदेशी,अजय मगर,आप्पासाहेब चव्हाण,शांताराम लहरे,अंबादास लहरे,बाबासाहेब लहरे,संतोष वाघ,ललित लहरे,अंबादास परबत,जगदीश घोडेराव,चेतन पुणेकर,संतोष भोपळे,वाल्मिक घोडेराव,महेश कोटमे,विठ्ठल गायकवाड,दादासाहेब जाधव,गोरख कोटमे,देविदास बिलवरे,बाळू धांद्रे,भीमराज कोटमे,दीपक कोटमे,विजय कोटमे,देवेंद्र लहरे,निवृत्ती माळी,मंगेश माळी,किरण मोरे,भास्कर मोरे,गुलाब मोरे,देविदास मोरे,ग्रामपंचायत कर्मचारी भैय्या काद्री,दिलीप घोडेराव,लखन वाघ, मोठ्या संख्येने स्वाभिमानी विकास पॅनलचे समर्थक व ग्रामस्थ उपस्थित होते.