शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतीगृहात आदिवासी दिन उत्साहात साजरा
येवला : पुढारी वृत्तसेवा
संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये जगामध्ये आदिवासींचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात असून त्यांचे जीवनमान नेहमीच उपेक्षित राहिले आहे. त्यांचे अस्तित्व मान्य करून जगापर्यंत पोहोचविण्यासाठी जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा करण्याचे घोषित केले ते औचित्य साधून आज आदिवासी मुला- मुलींचे वसतीगृह बाभुळगाव येथे माजी सभापती प्रवीण गायकवाड, वसतीगृह गृहपाल श्री विक्रांत कुकडे, गृहपाल सुशिला पेढेकर मॅडम,आदिवासी शिक्षक ग्रुप यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतिवीरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन तथा आदिवासी हा निसर्ग पूजक असून वृक्षरोपण व वृक्षपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या प्रसंगी इर्शाळवाडी येथील नैसर्गिक आपत्ती दगावलेल्या, मणिपूर येथील दुर्घटनेत बळी ठरलेल्या निष्पाप जीवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गृहपाल विक्रांत कुकडे सर यांनी प्रास्ताविकेतून वस्तीगृहाची परंपरा, आदिवासी दिनाचे महत्त्व विषद केले त्या बरोबरच विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजना सविस्तरपणे विद्यार्थ्यांसमोर मांडल्या व विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात माजी सभापती प्रवीण गायकवाड यांनी आदिवासी समाजाचा क्रांतिकारी इतिहास हा आपल्यासाठी ऊर्जा स्रोत आहे त्याची प्रत्येक ठिणगी विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहावे असे सांगतानाच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्षेत्रात रोजगार कसे उपलब्ध होतात, फॉर्म कुठे कसा भरायचा याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याने रोजगारक्षम व्हावे, विविध कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी प्राध्यापक जालमसिंग वळवी यांनी विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतिवीरांचा इतिहास अभ्यासून तिचे प्रेरणा पुढे घेऊन जात समाजासाठी, कार्यकरणाची स्वप्न बघून ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे म्हणत आपल्या मनोगत आतून व्यक्त केले तर प्राध्यापक शरद पाडवी यांनी आदिवासी समाज मागे असण्याचे प्रमुख कारण हे अज्ञान आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ञान होऊन वाचन,चिंतन, मनन करावे, जास्तीत जास्त पुस्तक वाचून ज्ञान समृद्ध होऊन क्रांतीची ज्योत पेटवावी असे आवाहन केले. श्री चव्हाण सर यांनी आदिवासी समाजात जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान आहे तो पटवून दिला.
आदिवासी दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली त्यासाठी शासकीय वैद्यकीय यांचे टीम उपस्थित होते. यात वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक पाटील, झुंजळे सर, लहाने सर, श्रीमती जगताप मॅडम, आरोग्य सेवक कुमावत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी केली व उत्तम आरोग्य याविषयी डॉक्टर विवेक पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी तारपा नृत्य,पावरी नृत्य,आदिवासी गीतांवरती नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरधर भिवसन, श्वेता वाख, रिया वळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन हिरामण मेश्राम सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी युवराज घनकुटे, योगेश्वर वळवी,अमर गावित,संतोष गावित, निलेश नाईक, सुभाष वाघेरे, वैभव सोनवणे, सुरेश पारधी, वंजी कुवर, आबा सोनवणे, दीपक भोये सर, राजेन्द्र पिंपळे, ज्ञानेश्वर माळी , वसतीगृह कर्मचारी श्रीमती हर्षा रोहम, रवींद्र जाधव, अभिजित खोड, लक्ष्मण दळवी, माया जगताप व वसतीगृहातील मुले व मुली उपस्थित होते.