विद्यार्थ्यांना...फार्मसी क्षेत्रातील व्यवसायाच्या संधीच्या मिळाल्या टिप्स! एस.एन.डी. फार्मेसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मिती प्रशिक्षण



विद्यार्थ्यांना...फार्मसी क्षेत्रातील व्यवसायाच्या संधीच्या मिळाल्या टिप्स!
एस.एन.डी. फार्मेसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मिती प्रशिक्षण 


येवला : पुढारी वृत्तसेवा

औषधनिर्माण शास्त्र (फार्मसी) विषयात शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याना शिक्षण पूर्ण होताच विविध नामवंत कंपन्यामध्ये नोकरीची संधी मिळण्यासह व्यवसायांच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एस.एन.डी. फार्मेसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मिती प्रशिक्षण घेण्यात आले.
जगदंबा एजुकेशन सोसायटीच्या एस.एन.डी.फार्मेसी महाविद्यालय व मातोश्री एजुकेशन सोसायटीचे, मातोश्री इंस्टिट्यूट ऑफ़ फार्मेसी धनोरे यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसाचे एस.एन.डी.फार्मेसी महाविद्यालयात येथे बारक्लेज रोजगार निर्मिती प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.जगदंबा एजुकेशन सोसायटीचे संचालक रुपेश दराडे, संचालक-प्राचार्य डॉ.रसिका भालके,प्राचार्य डॉ. प्रद्युम्न इगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर घेण्यात आले.
वाढत्या बेरोजगारीवर मात करता यावी तसेच व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याना त्यांचे
शिक्षण पूर्ण होताच नोकरीची उपलब्धता व्हावी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
तब्बल चार दिवस चालणाऱ्या शिबिरात इंग्रजी भाषेची आवड निर्माण करणे,सक्षम नागरिक घडविणे,महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्याना रोजगाराची संधी प्राप्त करुन देण्यासाठी तयारी पूर्ण करून घेणे,ट्रेनिंग व प्लेसमेंट, मुलाखतकौशल्य अर्थ,नियोजन  व्यक्तिमत्व विकास,संभाषण कौशल्य,विविध समस्यावर मात करण्याचे कौशल्य आत्मसात करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. 
प्रशिक्षक अंतरा बाजपेई,श्वेता गुप्ता,अभिषेक श्रीवास्तव,आशीष तिवारी यांनी प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना टिप्स दिल्या. शिबिराप्रसंगी प्राचार्य डॉ.प्रद्युम्न इगे यानींही विद्यर्थ्याना मार्गदर्शन केले. समन्वयक प्रा.विकास शिंदे, सहसमन्वयक प्रा.सोनाली वाघमारे,
प्रा.रामदास दराडे,प्रा.विजय रोकडे  आदिंनी म्हणून कामकाज पाहिले. याप्रसंगी प्रा.हबीबा शेख,प्रा.गायत्री वाघ यांनी संयोजन केले. 
फोटो
येवला : एस.एन.डी.फार्मेसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मिती प्रशिक्षनात सहभागी प्रशिक्षक,विद्यार्थी व प्राध्यापक.
थोडे नवीन जरा जुने