जालन्याच्या लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ येवल्यात मराठा समाजाचे आंदोलन.




जालन्याच्या लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ येवल्यात मराठा समाजाचे   आंदोलन.

 गृहमंत्री व जालन्याचे पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा.

येवला  : पुढारी वृत्तसेवा
जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती अमानुषपणे लाठीचार्ज करणाऱ्या प्रशासन व राज्य सरकारचा येवल्यात निषेध करण्यात आला या दरम्यान येवला तालुका पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. समाजाला आरक्षण मिळावा म्हणुन सुरू असलेल्या उपोषण स्थळी पोलिसांकडुन करण्यात आलेल्या अंधाधुंध लाठीमार आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला.ही घटना अतिशय दुर्दैवी व निषेधार्थ आहे. जो प्रकार उपोषणकर्त्यांवर घडलेला आहे  त्यात प्रशासन व राज्य शासनाची मोठी चुक झाली आहे. या घटनेचा संताप संपूर्ण राज्यभर पसरला असताना येवला येथील सकल मराठा समाजाच्या वतीने  शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन करण्यात आले जवळपास एक तासभर येथील कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले होते राज्य सरकार व प्रशासनाच्या विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली पोलीस अधीक्षक व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे लाठी चार्ज करणाऱ्या प्रशासन व राज्य सरकारचा अधिकार असो अशा घोषणांनी येवला तालुका पोलीस स्टेशन दानानून सोडले होते.यावेळी येथील ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विशाल क्षीरसागर व शहरचे कदम यांनी आंदोलकांची समजूत काढत झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे परंतु आपण संविधानिक मार्गाने आंदोलन करावा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी केले त्यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग शेळके प्राध्यापक प्रवीण निकम चंद्रमोहन मोरे.यांनी पोलीस स्टेशन मध्येच भाषण केले. झालेला प्रकार किती निंदणी आहे याबाबत सखोल चौकशी करून तेथील मराठा बांधवांना न्याय मिळवून द्यावा व येथील पोलीस अधीक्षक व फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व आंदोलनावर लाठी चार्ज करणाऱ्या प्रशासनाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी त्यांच्या भाषणातून केली तसेच या आशयाचे निवेदन देखील सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले यावेळी येवला तालुका पोलीस निरीक्षक व शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग शेळके   प्राध्यापक प्रवीण निकम, बबीता ताई कोल्हे, रावसाहेब पारखे, युवराज पाटोळे,छावा संघटनेचे आदित्य नाईक,जगदीश बोराडे, निवास बोनाटे, सागर गायकवाड,शरद बोरणारे रामेश्वर भड,ऋषी काळे रामदास गायकवाड संतोष गायकवाड गणेश पाटोळे,चंद्रमोहन मोरे योगेश ठाकरे आधी समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने