जालना येथील घटनेची सखोल चौकशी व्हावी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली मागणी

 जालना येथील घटनेची सखोल चौकशी व्हावी 

 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली मागणी

येवला : पुढारी वृत्तसेवा
 
जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणुन सुरू असलेल्या उपोषण स्थळी पोलिसांकडुन करण्यात आलेल्या अंधाधुंध लाठीमार आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार  झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. जे घडल त्यात प्रशासनाची चुक आहे,त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे
यासंबंधीचे निवेदन येवला तहसीलदार आबा महाजन यांच्याकडे देण्यात आले.  यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश लासुरे, जिल्हा उपाध्यक्ष सागर शेळके,जिल्हा, जिल्हा सहसचिव गोरख खोडके, 
जिल्हा सचिव आकाश ठोंबरे जिल्हा सरचिटणीस सागर खोङके, तालुकाध्यक्ष  प्रविण खैरनार, शहर अध्यक्ष लखन शिंदे, शहर उपाध्यक्ष अक्षय पंडोरे,तालुका सचिव आकाश गायकवाड़, उपतालुका अध्यक्ष रामा जांभळे, तालुका उपाध्यक्ष आदित्य रंधे,संजय सोमासे,तालुका सरचिटणीस जालिंदर पवार, तालुका संघटक निलेश साताळकर, तालुका उपाध्यक्ष विकास लहरे, गणेश आहेर, प्रसिद्धी प्रमुख दिलीप घोटेकर, गणेश मिटके, योगेश पवार, विशाल सुर्यवंशी, अमोल शिंदे, दिपक गुंजाळ, लकी गायके आदी उपस्थित होते
थोडे नवीन जरा जुने