पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गंगासागर तलावच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गंगासागर तलावच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु 

येवला :  पुढारी वृत्तसेवा

दिनांक 2 एप्रिल मंगळवार रोजी येवला शहरातील गंगासागर तलावात दुपारी तीन वाजेच्या सुमारास होण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
अमन अखिल शहा राहणार आंबिया कॉलनी असे या तरुणाचे नाव असून दुपारी तीन वाजेच्या सुमारास तो मित्रांसोबत पोहण्यासाठी केला होता मात्र तलाव खोल असल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तीन तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर पारेगाव व बाबुळगाव येथील पट्टीतल्या पोहणाऱ्या तरुणांनी या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला दरम्यान आमनच्या मृत्यूची बातमी समजताच समाज बांधवांनी उपजिल्हा रुग्णालय या येवला या ठिकाणी मोठी गर्दी केली होती
थोडे नवीन जरा जुने