युवकांनी कायदे समजून घेत त्याचे पालन करावे लोखंडे : एस.एन. डी.पॉलिटेक्निकमध्ये विध्यार्थांना कायद्याचे मार्गदर्शन

युवकांनी कायदे समजून घेत त्याचे पालन करावे
लोखंडे : एस.एन. डी.पॉलिटेक्निकमध्ये विध्यार्थांना कायद्याचे मार्गदर्शन

 
येवला :   पुढारी वृत्तसेवा

 भारतीय न्याय संहितेमध्ये विविध प्रकारचे कायदे समाविष्ट आहेत.या जुन्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नवीन सुधारित कायद्यामध्ये झालेली सुधारणा समजून घ्यावी.युवकांनी कायदे समजून घेत त्याचे पालन करावे म्हणजे आपल्या हातून चुकीचे कामे होत नाही असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लोखंडे यांनी केले.
जगदंबा शिक्षण संस्थेच्या संतोष दराडे पॉलिटेक्निकमध्ये विध्यार्थांना भारतीय न्याय संहितेमध्ये कायद्यात झालेलं बदल व त्यांचे स्वरूप याविषयी मार्गदर्शन करतांना श्री. लोखंडे बोलत होते.पोलीस कॉन्स्टेबल गणेश सांगळे,प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, प्राचार्य उत्तम जाधव प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
कायद्याचे स्वरूप कसे आहे,कुठल्या गुन्ह्यासाठी कोणता कायदा वापरला जातो व तसाठी कुठल्या प्रकारच्या शिक्षेची तरतूद त्यामध्ये आहे,नवीन बदल काय झाले याबाबत लोखंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.विध्यार्थांच्या मनात असणाऱ्या कायद्याबाद्दलच्या शंकांचे  समाधानकारक उत्तरे दिली.
राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे सार या विषयासाठी कायद्यांचा अभ्यास व त्यातील बदल विध्यार्थांना माहित असणे महत्वाचे आहे असे प्राचार्य उत्तम जाधव यांनी विध्यार्थांना सांगितले.या वेळी विभागप्रमुख ज्ञानेश्वर धनवटे,शोराब शेख,जयंत केंगे,राहुल आहेर,योगेश खरात,करीम अन्सारी,एकनाथ इंगळे,मोनाली कोकाटे,मानसी संसारे, रोशनी गुंजाळ, ज्ञानेश्वरी बनसोडे, आदींसह शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.
फोटो 
बाभूळगाव : एस.एन. डी.पॉलिटेक्निकमध्ये विध्यार्थांना कायद्याचे मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी दिनेश लोखंडे व प्राध्यापक-शिक्षक.
थोडे नवीन जरा जुने