विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे *इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड* तर्फे लिटल चॅम्प ऑलिम्पियाड रिझल्ट जाहीर करण्यात आला.
त्यात गोल्डन स्कूल अवॉर्ड, बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड, बेस्ट कॉर्डिनेटर अवॉर्ड, बेस्ट सब्जेक्ट टीचर अवॉर्ड आणि सर्व विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल प्राप्त झाले.
इंडियन टॅलेंट ओलंपियाड मध्ये इयत्ता नर्सरी ते युकेजी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला होता. त्यापैकी सर्वच विद्यार्थी अतिशय चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण होऊन त्यांना गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे,हेमंत शाह प्रमोद शेलार,संत चरणदास महाराज, प्रकाश गिरमे, तुषार कापसे उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच *बेस्ट प्रिन्सिपल तुषार कापसे, बेस्ट कॉर्डिनेटर मनीषा शिंदे, बेस्ट सब्जेक्ट टीचर सुजाता हेडगिरे यांना प्रत्यक्षात सदर बक्षीस वितरण कार्यक्रम *9 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई* येथे आयोजित केला असून सदर कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला बेस्ट क्रीडापटू भारतातील बॅडमिंटन क्षेत्रातील *साईना नेहवाल* तसेच पहिल्या आयपीएस अधिकारी *किरण बेदी* यांच्या हस्ते सर्व अवॉर्ड दिली जाणार आहे.त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या कामगिरीला येवला नगरीत विद्यार्थी,पालक व शिक्षकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
इयत्ता नर्सरी या क्लास मधून शरण्या कंदलकर, अनिशा मोरे, आर्वी पावरा, इरा गायकवाड, वेधार्थ पटेल,
एलकेजी क्लास मधून समर्थ हसणे, प्रणव सोंडगे, फरान तडवी,वेदिका माळोकर, गीतांजली जगझाप,शुभ्रा मगर, नक्ष वडे, शिवेंद्र आहेर,आरव झेंडे,आरव पैंजणे,आदित्य म्हाळणकर, भावेश पटणी, त्रिशा वखारे,वेदांत काळंगे,इशिता शिंदे, त्रिशा लुळेकर
युकेजी क्लास मधून आरुष राऊत,
अद्विक काबरा, शिवांश मिस्कीन, शाश्वत दुबिले,शौर्य पाटील, मितांश टाके, आराध्य भावसार,आराध्य ढमाले, अभिज्ञा मगजी,त्रिशा शिंदे, अनिका जाधव, शर्वरी पल्ले,रुद्र लचके,आयुष भंडारी,अन्वेष खरडकर, आदित्य परदेशी, कल्याणी लकारे, साक्षी खत्री, विराज सपकाळ इ. विद्यार्थ्यांना लिटल चॅम्प इंग्लिश ओलंपियाड, ड्रॉईंग ओलंपियाड, ईव्हीएस ओलंपियाड,मॅथ ओलंपियाड या विषयांमध्ये प्राविण्य मिळाले.
तसेच आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल येवला या शाखेस *गोल्डन स्कूल अवॉर्ड* जाहीर झाला, तुषार कापसे यांना *बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड* तर मनीषा शिंदे व चित्रलेखा परदेशी यांना *बेस्ट कॉर्डिनेटर* अवॉर्ड, सुजाता हेडगिरे, पोर्णिमा वाघ व प्रीती शिरसाट यांना *बेस्ट सब्जेक्ट टीचर अवॉर्ड* देण्यात आला.