येवल्यातील विणकारांनी देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
येवला : पुढारी वृत्तसेवा
विणकारांना मोफत 200 युनिट वीज श्री विणकारांना 15000 रुपये तर पुरुष विनकारांना दहा हजार रुपये उत्सव भत्ता दिल्याबद्दल येवल्यातील विणकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची मुंबई येथे भेट घेत राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त त्यांना रेशमी पैठणी फेटा व शाल देऊन त्यांचे आभार मानले.
७ ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय येथे युवा विणकर नेते तथा भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मयूर रवींद्र मेघराज यांनी भेट घेतली. विशेष म्हणजे मंत्रालयात आज कॅबिनेट बैठकीमुळे हजारोंची गर्दी असताना देखील मेघराज यांना वेळ दिला देवेंद्र फडणवीस यांनी विनकरांसाठी वस्त्र उद्योग धोरण २०२३-२०२८ यामध्ये २०० युनिट वीज मोफत दिली व स्त्री विणकारांना १५ हजार रुपये , पुरुष विणकाराला १० हजार रुपये उत्सव भत्ता सुरू केला व त्याचा लाभ प्रत्यक्ष विणकाराला मिळाला देखील त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पैठणी फेटा परिधान करून व रेशमाची कळी देऊन मयूर मेघराज यांच्या सोबत गेलेल्या शिष्टमंडळाने ने देवेंद्रजींचे धन्यवाद मानले शिष्टमंडळामध्ये भाजपा नाशिक जिल्हा महामंत्री संतोष केंद्रे , विणकर गणेश पवार, सचिन करंजकर, गौरव खेरुड, हेमंत सांबर किशोर लखारे आदी होते. त्याचबरोबर केंद्र शासनाचे विनकर पहचान कार्ड 40% विनकारांकडे नसून ते केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजने पासून वंचित राहत आहे अशा विनकरांमध्ये विणकर पिढ्यानपिढ्या विनकरी करणारे देखील आहेत त्यांना विणकर कार्ड लवकरात लवकर भेटण्यासाठी मदत करावी अशा पद्धतीने निवेदन देखील मयूर मेघराज यांनी दिले त्याचप्रमाणे मेघराज यांनी 24 जून 2023 रोजी विणकारांच्या विविध समस्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते देवेंद्रजींनी कोणताही विलंब न लावता वस्त्र उद्योग विभागाकडे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मेघराज यांची विणकारांच्या समस्यांबाबत बैठक लावली होती त्याच बैठकीमुळे विणकारांना प्रत्यक्ष लाभ भेटला असे विणकारांकडून सांगण्यात येत आहे मयूर मेघराज यांच्या या कार्याचे सर्वेकडे कौतुक होत आहे.