कै.नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेची 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत 


कै.नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेची 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

येवला : पुढारी वृत्तसेवा

सहकार क्षेत्रात येवला तालुक्यात अग्रगण्य असलेली कै. नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था ही अ वर्गात असून संस्थेचा कारभार अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे या पतसंस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मनमाड रोड येथील सूर्या लॉन्स मध्ये संपन्न झाली 
संस्थेच्या सर्व सभासदांना या सभेचा निमंत्रण देण्यात आले होते या ठिकाणी 
सन 2023- 24 मधील सर्व कारभार हा सभासद समोर ठेवण्यात आला तसेच सर्व सभासदांना 12 टक्क्यांचा डिव्हीडंट वाटप करण्यात आला यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण होते 
संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक व सभासद तथा संस्थेचे अधिकारी मिळून प्रयत्न करावे असे आवाहन संस्थापक माजी आमदार मारोतराव पवार यांनी याप्रसंगी बोलताना केले 
व्यासपीठावर चेअरमन आप्पासाहेब खैरनार, व्हाईस चेअरमन पिके काळे, प्रभारी मॅनेजर आणि तांबोळी, यासह कार्यकारी संचालक संभाजी पवार. व संस्थेचे सर्व संचालक सभासद उपस्थित होते
थोडे नवीन जरा जुने