नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांची नियुक्ती

 

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांची नियुक्ती


येवला :  पुढारी वृत्तसेवा

 महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर शिवसेनेचे विधानपरिषद सदस्य किशोर दराडे यांची नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या सोबतच नाशिक शहरातील भाजप-राष्ट्रवादीच्या चारही आमदारांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार या समितीवर शासन नियुक्त सदस्यपदी आमदार दराडे यांची वर्णी लागली आहे.नुकतेच नाशिक शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले श्री.दराडे हे शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न मार्गी लावून शिक्षकांमध्ये लोकप्रिय आहेतच.मात्र येवला नगरपालिका कार्यक्षेत्रात त्यांनी  कोट्यावधीची कामे मार्गी लावली आहे. जनहिताची कामे करण्याची आवड असल्याने या समितीवर त्यांची वर्णी लागली आहे.
नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची २००८ पासून सुरुवात केली आहे.नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत असल्याने शहराला लागून असलेला तालुका परिसरात देखील व्यवसाय वाढत असल्याने व्यावसायिकांना मुलभूत सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय सुरू करण्यात आले.या कार्यालयाच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधीची उपलब्धता, पायाभूत सुविधांचा विकास, विकासाचे नियोजन, गुंतवणुकीला प्राधान्य देण्याचा हा उद्देश आहे.नाशिक महानगरला लागून असलेल्या सिन्नर,इगतपुरी,दिंडोरी,त्र्यंबकेश्वर आणि निफाड या तालुक्यातील २७५ गावांचा समावेश आहे.  
नगरविकास विभागाने २१ ऑगस्ट, २००८ च्या अधिसूचनेव्दारे नाशिक महानगर क्षेत्र म्हणून घोषित केले असून १ मार्च २०१७ च्या अधिसूचनेद्वारे नाशिक महानगर क्षेत्रासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापन करण्यात आलेली आहे. या प्राधिकरणावर आमदार राहुल ढिकले,सिमा हिरे,देवयानी फरांदे,सरोज अहिरे या विधानसभा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.सोबतच दराडे यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मला हा काम करण्याची संधी मिळणार असून प्राधिकरणाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यासह रखडलेल्या कामांना चालना देण्यासाठी काम करेल.यासाठी शासनाकडे ठोस पाठपुरावा करेल अशी प्रतिक्रिया श्री.दराडे यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केली.

सोबत फोटो
थोडे नवीन जरा जुने