रिपाइं ( राजरत्न आंबेडकर) पक्ष तालुकाध्यक्षपदी योगेश पोळ तर उपाध्यक्षपदी भिमराव खळे
येवला (नितीन संसारे) :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राजरत्न आंबेडकर) पक्षाच्या येवला तालुकाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ यांची तर उपाध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते भिमराव खळे यांची पक्ष वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. निवडीचे पत्र संबंधितांना देण्यात आले आहे. पक्षाचा झंझावात तालुकाभर निर्माण करण्याचा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये पक्षाच्या शाखा खोलुन सर्व वयोगटातील नागरिकांना पक्षात घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू असे आश्वासन यावेळी योगेश पोळ व भिमराव खळे यांनी दिले. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात आले.