राहुल गांधींना धमकी देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक 


राहुल गांधींना धमकी देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करा
       येवला तालुका काँग्रेस कमिटीची मागणी


येवला : पुढारी वृत्तसेवा

भाजप आणि त्यांचे मित्र पक्षाच्या नेत्यांकडून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व खासदार राहुल गांधी त्यांची हत्या करण्याची, त्यांची जीभ कापण्याची, जिभेला चटके देण्याच्या धमक्या दिल्या जात आहे व त्यासाठी बक्षीसही जाहीर केली जात आहे. त्यामुळे खासदार राहुल गांधी यांच्या जीविताला भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या नेत्यांपासून धोका निर्माण झालेला आहे हे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील भाजपचा नेता तरविंदरसिंह  मारवा यांनी राहुल गांधींची अवस्था त्यांचे आजी इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे करू अशी खुले आम धमकी दिली आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री रवणीत बिट्टू यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यास अकरा लाखाचे बक्षीस जाहीर केले आहेत तर भाजपचा खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत असे गंभीर वक्तव्य केले आहे. भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांच्या नेत्यांची वक्तव्य गंभीर असून समाजामध्ये असहिष्णुता तसेच अराजगता निर्माण करणारी आहे. भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांचे नेत्यांची वक्तव्य गंभीर असून राहुल गांधी यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तरी भाजप नेता तरविंदरस मारवा, केंद्रीय मंत्री रवणीत बिट्टू, आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी यासाठी येवला तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तहसीलदार आबा महाजन नायब तहसीलदार पराते यांना निवेदन देण्यात आले. सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन अटक न झाल्यास येवला तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. 
      यावेळी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, भगवान चित्ते, नानासाहेब शिंदे, आबासाहेब शिंदे, अक्षय शिंदे, शिवाजी वाघ, जमील पटेल, राजेंद्र गणोरे, जयप्रकाश वाघ, अनिल मुथा, दिपक खोकले, ऋषिकेश सोमासे, निलेश शिंदे, मधुकर सरोदे आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने