स्वच्छता ही सेवा अंतर्गत येवला शहरात स्वच्छता अभियान
विविध शाळा आणि कॉलेज यांद्वारे जनजागृती
येवला : पुढारी वृत्तसेवा
स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय,भारत सरकार यांच्या वतीने येवला नगरपरिषद येवला दि.१८सप्टेंबर २०२४ ते २ ऑक्टोबर २०२४ स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या वर्षी स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता हे अभियान 18 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर शहरात माननीय मुख्यधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली राबिवण्यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून,दिनांक २३ /०९/२०२४ रोजी कला वाणिज्य विद्यालय येवला कॉलेजच्या विद्यार्थी/विद्यार्थिनी यांच्याकडून स्वच्छता रॅली काढून कॉलेज परिसरात साफसफाई करण्यात आली. यानंतर एंझो केम हायस्कूल येवला येथील स्वच्छता रॅलीचे आयोजन करून परिसरात स्वच्छता करण्यात आली. शहरात देखील येवला नगरपालिकेच्या पाच पथक तयार करण्यात आलेले होते यात 60 फुटी रोड महात्मा फुले कॉलनी स्टेशन रोड विंचूर चौफुली ते होळकर घाट बस स्टँड मेन रोड शाह कॉलनी परदेशपुरा डी जे रोड आदी भागात स्वच्छता मोहीम करण्यात आली. या मोहिमेसाठी मंत्री नामदार छगनर भुजबळ यांच्या वतीने डंपर ट्रॅक्टर जेसीबी व स्वयंसेवक खाजगी कर्मचारी इत्यादी सहकार्य मंत्री महोदयाच्या वतीने करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली या मोहिमेसाठी स्वच्छता दूत योगेश तक्ते यांच्याकडून हजार मास्क हजार हँड ग्लोज व पाचशे पाणी बॉटल कर्मचाऱ्यांना देण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित मुख्याधिकारी राहुल आहेर उपमुख्यधिकारी चंद्रकांत भोये प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे स्वच्छता निरीक्षक सागर झावरे माजी नगरसेवक मुस्ताक शेख अमजद शेख पर्यावरण दूत योगेश तक्ते सचिन सोनवणे सर्व प्रशासकीय अधिकारी
आदित्य मुरकुटे प्रशासकीय अधिकारी गोविंद गावंडे वरिष्ठ लिपिक शिवशंकर सदावर्ते लेखाधिकारी किरण अहिरे राहुल पाटील संगणक अभियंता गौरव चुंबळे संदिप बोढरे सुमित उपसने शितल शेळके प्रभाकर वाघ राजेश निकम उदय परदेशी राधेश्याम निकम शशिकांत मोरे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
येवला शहरात आज स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. स्वच्छता ही राष्ट्रभक्ती आहे. त्यामुळे सर्वांनी यात सहभागी होऊन मोठया प्रमाणात लोकसहभाग देऊन व्यापक स्वच्छतेची चळवळ निर्माण करावी,
तुषार आहेर
मुख्याधिकारी येवला नगरपरिषद येवला