स्वच्छता ही सेवा अभियान २०२४ व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण व स्वच्छता दूत नियुक्ती....
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवला नगरपरिषद व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा ५.० अंतर्गत येवला शहरातील सामाजिक कार्यात योगदान देणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा येवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन पर्यावरण दूत म्हणून गौरवण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित उपमुख्यधिकारी चंद्रकांत भोये, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता सुमित काळोखे, स्वच्छता ब्रँड अँबेसिडर अविनाश शिंदे, स्वच्छता ब्रॅण्ड अँबेसिडर श्रीकांत खंदारे, प्रशासकीय कर अधिकारी गोविंद गवंडे, स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, कर निरीक्षक आदित्य मुरकुटे, शहर समन्वयक गौरव चुंबळे, प्रकल्पाधिकारी शितल झावरे, प्रभाकर वाघ, नितीन आहेर, उपेंद्र कुलकर्णी, आधी उपस्थित होते. यावेळी सन २०२४ मध्ये वृक्ष लागवडीमध्ये व पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणारे डॉ योगेश जेजुरकर, डॉ अलंकार गायके, डॉ संगीता पटेल, डॉ राम खोकले, डॉ मनोहर पाचोरे, आदींना पर्यावरण दूत म्हणून गौरविण्यात आले तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे अन्सार भाई शेख, योगेश तक्ते, निलेश पांगुळ, शैलेश नागपुरे, कपिल देशमुख, रूप सिंग परदेशी, आशिष अंकाईकर, माधव पिंगळे, नारायण शिरसागर, ज्योती खंदारे, ज्योती जाधव, आदींचा पर्यावरण दूत म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शहरातील प्लास्टिकला पर्याय म्हणून पर्यावरण दूतांना मुख्याधिकारी तुषार आहेर व पाणीपुरवठा अभियंता सुमित काळोखे यांच्या हस्ते कापडी पिशवी वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप बोढरे यांनी केले
डॉ असोसिएशन तर्फे सुमारे १००० वृक्षांची लागवड करण्यात आले असून गेली २ वर्षात झाडांचा चांगल्या पद्धतीने संगोपनाची जबाबदारी डॉ असोसिएशन तर्फे घेतली जात आहे.
डॉ. योगेश जेजुरकर
पर्यावरण दूत
येवला नगर परिषदेमार्फत स्वच्छता पंधरवडा अभियानाला सुरुवात झाली असून १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत हे अभियान शहरात राबवले जाणार असून तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी आपले योगदान द्यावे.
तुषार आहेर
मुख्याधिकरी
येवला नगरपरिषद, येवला