मातोश्री फार्मसीमध्ये रंगला औषधांवरील पोस्टर सादरीकरणाचा आविष्कार!

मातोश्री फार्मसीमध्ये रंगला औषधांवरील पोस्टर सादरीकरणाचा आविष्कार!


येवला : पुढारी वृत्तसेवा

एकलहरे (नाशिक) येथील
मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालय स्तरावरील आविष्कार स्पर्धा संपन्न झाली.यातील विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर सादर केले.पोस्टर सादर करताना,ड्रग डिलिव्हरी सिस्टीम,हरबल फॉर्मुलेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विषय निवडले होते.या स्पर्धेत ३८ स्पर्धकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉ. गोकुळ तळेले यांनी संशोधनाच्या गरजे विषयी मार्गदर्शन केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. सुराणा संतोष व डॉ. रमणलाल कच्छवे यांनी पार पाडले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन पुजा शिंदे व मानसी बंदावणे यांनी केले.महाविद्यालयाच्या संशोधन समन्वयक म्हणून वर्षा चौधरी यांनी नियोजन केले. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी अनुष्का गणोरे व ऋतुजा हळदे (प्रथम पारितोषिक) या विद्यार्थिनींनी पटकावले.पुजा कथले व काव्य खडत्कार (द्वितीय पारितोषिक) यांना तर पदव्युत्तर पदवित साक्षी गावले व मयूर डावरे (प्रथम पारितोषिक ) व निशा पुरकर (द्वितीय पारितोषिक) यांनी मिळवले.वर्षा चौधरी,आदिती पुणेकर,डॉ. प्रशांत मालपुरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे व सचिव कुणाल दराडे यांचे सहकार्य लाभले. उपप्राचार्य डॉ.सचिन कापसे, डॉ. प्रशांत मालपुरे,पराग कोठावदे,निशा ढोकळे, विकास केदार, श्वेता झाल्टे,श्रद्धा भावसार,सुरेखा पाटील,गायत्री वाघ,दिपाली जोशी,दीप्ती चौधरी,अक्षदा बैरागी,स्वाती दराडे,आदर्श वाघ, जयश्री पाटील,सुप्रिया जाधव,सोनिका देवरे आदींनी नियोजन केले.
एकलहरे : मातोश्री फार्मसी महाविद्यालयात पोस्टर सादरीकरन करताना विद्यार्थी.
थोडे नवीन जरा जुने