शहरातील विविध कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे बेमुदत उपोषण....



शहरातील विविध कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे बेमुदत उपोषण....

येवला : पुढारी वृत्तसेवा

      गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या ड्रेनेज... रस्ते ....नाले साफसफाई या संदर्भात अनेक निवेदन दिले होते, तरी देखील प्रशासनाने यात कोणती दखल घेतली नाही म्हणून 23 सप्टेंबर रोजी पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा देत निवेदन अर्ज देण्यात आला. तरी देखील प्रशासनाने कोणती दखल न घेतल्यामुळे  सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येवला लासलगाव विधानसभेचे कार्यकारी अध्यक्ष अजिज भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बेमुदत उपोषण नगरपालिका प्रवेशद्वारावर सुरू करण्यात आले. उपोषणाला पाठिंबा मिळत असल्याचे पाहत नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले व त्यानंतर त्यांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट माणिकराव शिंदे यांनी मध्यस्थी करत अनेक मागणी असलेल्या कामांपैकी काही कामे मार्गी लावत व उर्वरित कामांचे लेखी आश्वासन द्यावे असे नपा प्रशासनास विनंती केली...अखेर सायंकाळी येवला नगरपरिषदेने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले .

     याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येवला लासलगाव विधानसभा अध्यक्ष सुभाष निकम ,  कार्यकारी अध्यक्ष अजिज शेख , येवला शहराध्यक्ष योगेश सोनवणे , उपाध्यक्ष राजेंद्र हिरे , वाल्मीक सोपे , अन्सार भाई शेख , काका वाणी ,  ओबीसी सेल शहराध्यक्ष पंकज माळी , जिल्हा पधाधिकारी दिपक लाठे , उमर शेख , अन्सार पेंटर , आरीफ अन्सारी  , बिलाल शेख , फैययाज शेख , इम्तियाज शेख , अरबाज अन्सारी हे पक्षातर्फे उपस्थित होते.... तर अनेक शहरातील मान्यवरांनी उपोषण स्थळी दिवसभरात भेटी दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने