*भाविकांसाठी मनमाड ते पंढरपूर रेल्वे सुरू करण्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी...*

 *भाविकांसाठी मनमाड ते पंढरपूर रेल्वे सुरू करण्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी...*



     दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर रावजी भगरे सर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड .माणिकराव शिंदे यांनी मनमाड ते पंढरपूर विकली स्पेशल प्रायोगिक तत्त्वावर ही रेल्वे सुरू करावी अशी मागणी केली आहे .त्या संदर्भातले पत्रही त्यांनी खासदारांना पाठवले व फोन वरूनही आपण आता अधिवेशनात आहात तर रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून त्वरित यासाठी पत्रव्यवहार करा अशी विनंती केली .मनमाड वरून पंढरपूर येथे जाण्यासाठी डायरेक्ट कोणतीही रेल्वे उपलब्ध नाही. मनमाड वरून दौंड पुढे कुरूडवाडी व पंढरपूर असे दोन ते तीन टप्प्यांमध्ये भाविक भक्तांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे मनमाड ते पंढरपूर अशी थेट रेल्वे सुरू करून किमान हप्त्यात एक दिवस ही रेल्वे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावी अशी विनंती केली.मनमाड वरून येवला , कोपरगाव , पुणतांबा , राहुरी , अहिल्यानगर व पुढे आवश्यक असतील ते स्टेशन घेऊन शेवट पंढरपूर असा नियोजित रेल्वेचा मार्ग असावा. साधारणता रविवारी संध्याकाळी प्रवासी जर मनमाड येथून निघाले तर दुसऱ्या दिवशी सकाळी पंढरपूर पोहोचू शकतात. व परतीच्या प्रवासाला तीच गाडी जर रात्री 8 वाजता पंढरपूर वरून निघाली तर मंगळवारी सकाळपर्यंत यात्रेकरू हे आपल्या घरी पोहोचू शकतात. 




कृपया आमच्या या मागणीचा संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून नाशिक वा आहिल्या नगर जिल्ह्यातील भाविक भक्तांसाठी मनमाड ते पंढरपूर विठोबा एक्सप्रेस / माऊली एक्सप्रेस / अथवा रुक्मिणी एक्सप्रेस या नावाने एक्सप्रेस सुरू करावी अशी खासदारांना ॲड .माणिकराव शिंदे ,  तालुका अध्यक्ष विठ्ठल शेलार तथा  येवला शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांनी एका पत्रकार परिषद मध्ये केली.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने