एक लाख कोटींचा नदीजोड प्रकल्प – चांदवड-येवला कोरडाच? प्रस्तावित जलवाटपात

 एक लाख कोटींचा नदीजोड प्रकल्प – चांदवड-येवला कोरडाच?

प्रस्तावित जलवाटपात

दुष्काळी तालुक्यावर अन्याय... 


येवला व चांदवड साठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याची सोनवणे यांची मागणी


येवला 


दिनांक 8 ऑगस्ट 2025



एक लाख कोटी रुपयांचा खर्च करून राबवण्यात येणाऱ्या पश्चिम वहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रस्तावित योजनेला जलसंपदा मंत्री यांनी 61 कोटी रुपये सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी मंजूर केले आहेत मात्र प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील कायमचा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदवड आणि येवला तालुके लाभक्षेत्राबाहेर राहतील,कारण पार गोदावरी योजने मुळे उपलब्ध पाणी ऊर्धव गोदावरी प्रकल्पान्ची तूट भरून देण्याचे कोणतीही नियोजन नसल्याने या नदीजोड प्रकल्पा मध्ये आमच्या साठी काय असा प्रश्न पाणी प्रश्नाचे अभ्यासक व जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी विचारला आहे..


प्रकल्पाच्या आराखडयात 

दमणगंगा-एकदरे

दमणगंगा-वैतरणा

देवनदी-गोदावरी

उल्हास-वैतरणा-गोदावरी

पार-गोदावरी

या लिंक योजना प्रस्तावित असून त्यातून 90 टी एम सी (अब्ज घनफूट) पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून त्यांचा लाभ अहिल्या नगर मधील मुळा उपखोरे प्रवरा उपखोरे द्वारे भंडारदरा व मुळा धरणात पाणी  उपलब्ध करुन जायकवाडी धरण मार्गे पुढे मराठवाड्यात पाण्याची उपलब्धता वाढविण्यात येणार आहे.

या नदीजोड प्रकल्पा चा येवला व चांदवड तालुक्यातील दुष्काळी भागाला नेमका फायदा काय असा ही प्रश्न जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी केला आहे.

पार-तापी-नर्मदा हा गुजरात कडे पाणी घेऊन जाणाऱ्या नदी जोड प्रकल्पास सोनवणे यांनी 2014 मध्ये कडाडून विरोध केला होता. ही योजना रद्द होऊन महाराष्ट्रातील पाणी महाराष्ट्रात राहणार असला तरी येवला व चांदवड चा वाटा आधी निश्चित करा, त्यांचा सविस्तर प्रकल्प  अहवालात समावेश करा अशी सोनवणे यांची मागणी आहे.


अपेक्षित पाणी उपलब्धता:


*असा आहे गोदावरी नदी जोड प्रकल्प*


एकूण: ~ ९० टीएमसी (नाशिक, नगर, मराठवाडा)


खर्च: ~ ₹ १,००,००० कोटी


डीपीआर निधी: ₹ ६१ कोटी मंजूर



विद्यमान आराखड्यात उर्ध्व गोदावरी प्रकल्पात (Upper Godavari Project) अतिरिक्त पाणी आणण्याची तरतूद नाही.

त्यामुळे चांदवड आणि येवला तालुके कोरडेच राहतील.


"

*पार-गोदावरी लिंक योजनेतील नार-पार खोऱ्यातील ९.७६ टीएमसी आणि उपसा सिंचन योजना क्र. ३ व ४ मधील ३ टीएमसी पाणी येवला व चांदवड साठी आरक्षित ठेवावे,*

*मांजरपाडा वळण योजना – ६०० दशलक्ष घनफूट पाणी अडवले जाते, त्यातील ३०० दशलक्ष घनफूट पुणेगाव धरणात येते, पण फारसा अतिरिक्त सिंचन लाभ होताना दिसत  नाही.त्यामुळे पार-गोदावरी चे सर्व पाणी येवला व चांदवड साठी आरक्षित करावे* :-*

- भागवतराव सोनवणे

संयोजक जल हक्क संघर्ष समिती, येवला


*भागवतराव सोनवणे यांचे प्रस्तावित बदल*


*पार-गोदावरी आराखड्यात सुधारणा*


नार-पार खोरे + उपसा सिंचन योजना (३+९.७६ टीएमसी) पाणी समाविष्ट करणे.


चांदवड, येवला, आणि वैजापूर (संभाजीनगर) या दुष्काळी पट्ट्यांना पाणी प्राधान्याने देणे.


एकदरे धरणाचे पाणी –वाघाड, करंजवण, ओझरखेड, तिसगाव धरणात वळवून नाशिक जिल्ह्यात वापरणे.


पाणी वळण क्षमता वाढवणे


९० टीएमसी ऐवजी ११५ टीएमसी पाणी वळविण्याचे नवे लक्ष्य आराखड्यात ठेवणे.

***************


चांदवड व येवला तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागात पाण्याची तीव्र टंचाई असून, शेती सिंचनासाठी भूजलावर अवलंबून राहावे लागते.

पाणी अभावी स्थलांतर, बेरोजगारी आणि सामाजिक तणाव या भागात वाढला आहे.त्या साठी या तालुक्यावर अन्याय होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पुढे येऊन आपल्या लोकप्रतिनिधी मार्फत पाठपुरावा करावा असेही सोनवणे यांनी म्हटले आहे.

*******************

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने