विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या 3 खेळाडूंची जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी

विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या 3  खेळाडूंची जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी

विद्या इंटरनॅशनल स्कूल यशाची परंपरा कायम



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवकसेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक, आयोजित जिल्हास्तरीय 14-17-19 वयोगटाखालील ( मुले/मुली) यांच्या शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा नुकत्याच 25 ऑगस्ट रोजी एकूण 447 विद्यार्थ्यांच्या सहभागाने नासिक येथील राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे मोठ्या उत्साहात व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या
सदर स्पर्धेत विद्या इंटरनॅशनल स्कूलचा 14 वर्षाखालील मुलाच्या  वयोगटात इयत्ता सातवीतील विद्यार्थी ललित निलेश दळवी याने 200 मीटर मिडले या प्रकारात उत्तम अशी कामगिरी करून स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले तसेच 50 मीटर बटरफ्लाय या प्रकारात इयत्ता आठवीतील विद्यार्थी अनुष गोयकर यांने आणि 50 मीटर बॅक स्ट्रोक  या प्रकारात इयत्ता आठवीतील विद्यार्थी अर्णव जगताप याने उत्कृष्ट कामगिरी केली व  सर्व विद्यार्थ्यांची नासिक विभागीय संघात स्थान मिळवले.


नासिक येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे,व कलात्मक गुणांचे प्रदर्शन करून सर्व खेळाडूंची पुढील महिन्यात होणाऱ्या विभागीय जलतरण स्पर्धेसाठी त्याची नासिक विभागीय संघात निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ.राजेश पटेल ,डॉ.संगीता पटेल ,शाळेच्या प्राचार्या सौ.शुभांगी शिंदे मॅडम आणि सर्व  शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. सदर खेळाडूंना शाळेतील जलतरण प्रशिक्षक सौ. रेश्मा परदेशी मॅडम,विनायक धिवर सर, दत्तात्रय चव्हाण आणि शाळेचे क्रीडाशिक्षक किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले..




टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने