विद्या इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
येवला :
विद्या इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साह साजरा करण्यात आला याप्रसंगी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रवीण व्यवहारे सर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.सदर कार्यक्रमात आजच्या या क्रीडा दिनाचे औचित्य साधून तालुकास्तर, जिल्हास्तर ,विभाग स्तर विविध खेळाच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे श्री.व्यवहारे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शाळेतर्फे अध्यक्षांचा सत्कार प्राचार्य सौ.शुभांगी शिंदे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला..
अध्यक्षीय भाषणात व्यक्त होताना मेजर ध्यानचंद यांचा संपूर्ण इतिहास व त्यांनी केलेले खेळाप्रती कौतुकास्पद कामगिरी, ऑलम्पिक स्पर्धेत त्यांनी रचलेला इतिहास त्याची सखोल माहिती त्यांनी दिली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धांमध्ये सहभागी होणे बाबत सांगितले, विद्यार्थ्यांनी कोणकोणते खेळ खेळावेत व खेळाच्या माध्यमातून राज्य शासनातर्फे व केंद्र शासनातर्फे बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत याची संपूर्ण माहिती त्यांच्या सांगितली, खेळामुळे शासन स्तरावर विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, पुरस्कार, खेळात पाच टक्के आरक्षण, खेळामध्ये करिअर करता येऊ शकते याबद्दल मार्गदर्शन केले. खेळात शिस्त हा महत्त्वाचा भाग आहे याचा विशेष उल्लेख करून विद्यार्थ्यांनी किमान एक तास क्रीडांगणावर नियमित कुठलाही खेळ खेळावा असे आवर्जून सांगितले. क्रीडाशिक्षक श्री किरण कुलकर्णी यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला इयत्ता दहावीचे विद्यार्थिनी स्वरा ठाकरे हिने सूत्रसंचालन केले उपक्रम विभाग प्रमुख स्वप्निल थोरात, पारस भगत, सागर कांगणे यांनी कार्यक्रम यशस्वी साठी परिश्रम घेतले.