*बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा.......*
येथील श्री शिवाजी शिक्षण मंडळ संचलित बनकर पाटील पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये शिक्षक दिन संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बनकर व प्राचार्य पंकज निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले. ५ सप्टेंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे जीवनातील महत्व, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १९६२ साली शिक्षक दिनाची केलेली सुरुवात, त्यांचे कार्य अशी शिक्षक दिनाची संपूर्ण माहिती आपल्या भाषणातून दिली. तसेच इयत्ता दहावीतील शिवम सावळे, श्रुती मोरे व इ. बारावीतील आरती गायकवाड, स्नेहल खकाळे,साक्षी कदम, स्नेहा बोराडे आदी विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. प्रवीण बनकर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट व एक शिक्षक म्हणून आपली पिढी घडविण्याची सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी याविषयी मत व्यक्त केले. सदर प्रसंगी इयत्ता दहावीतील विद्यार्थांनी शाळेतील सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार केला तसेच अल्पोपहार देत शिक्षकांप्रति आपला आदर व्यक्त केला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधत इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थांनी समन्वयिका रुपाली चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनावर आधारित नाटिका सदर केली व शिक्षकांची भूमिका बजावली. कु. आयुष मुंढे याने प्राचार्य पदाचे कामकाज पाहिले. तसेच विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या रोजच्या शिक्षकांनाही खेळाचा आनंद मिळावा म्हणून सर्व शिक्षकांसाठी संगीत खुर्ची व ट्रेजर हंट या खेळांचे आयोजन करत आपल्यातील नियोजन कौशल्य दाखविले.
आपल्या सर्वांच्या जडणघडणीत शिक्षकांचे मोलाचे स्थान आहेच परंतु या सर्वांत आपली आई हि महान गुरु – शिक्षक असून तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आई हि प्रथम शिक्षिका असून शाळेतील शिक्षक हे विषयज्ञान देतात तर आई जीवण जगण्याची कला शिकवते. उज्वल भविष्य घडविण्यात अनेक व्यक्तींचा सहभाग असतो त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षक म्हणून गुरुस्थानी ठेवणे वावगे ठरू नये असे प्रतिपादन प्राचार्य निकम यांनी आपल्या मनोगतात विविध दाखल्यांच्या आधारे विषद केले. यावेळी सर्व विद्यार्थिनी पारंपारिक वेशभूषेत हजर होत्या.
विद्यार्थिनी सुजल कदम , ओम ठोंबरे, पूर्वा तांबे, ईश्वरी हेंबाडे, प्रतीक्षा जाधव, तेजस्विनी जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर सर्वेश ताडगे याने आभार प्रदर्शन केले. यावेळी प्रशांत तात्पुरकर, विकास मोरे, प्रसाद मोरे, निखील जाधव,रवींद्र सूर्यवंशी, शिवाजी झांबरे, दिपाली जाधव, योगिता शिंदे, वृषाली पानगव्हाणे, नेहा सोनार, कोमल निघोटे, अर्चना जाधव, सारिका उंडे, किरण मुळे, प्रियांका पटेल, प्रियांका कासले, प्रसाद मोरे तसेच कनिष्ट विभागाच्या गायत्री बाकळे, अनिल कुळधर, विजय मढवई, स्वाती मुकिंद, मृगया गुजराथी आदि कर्मचारी उपस्थित होते.


