*आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून येवला शहरातील विविध गणेश उत्सव मंडळांना भेटी*
येवला,दि.३ सप्टेंबर :-* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी गणेशोत्सवानिमित्त येवला शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी आमदार पंकज भुजबळ यांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळांच्या वतीने आमदार पंकज भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला.
आमदार पंकज भुजबळ यांनी येवला शहरातील समाजसेवक मित्र मंडळ, काटा मारुती तालिम संघ, श्रीकांत खंदारे गणपती, संत नामदेव व्यायाम शाळा, न्यु डीस्को फ्रेंड सर्कल, संतोष शोशल ग्रुप,जाईचा मारुती तालिम संघ, रिद्धी सिद्धी गणेश मदिर मंडळ, नवभारत मित्र मंडळ, तिरंगा ग्रुप, फत्तेसिंग मित्र मंडळ,एस.एम. ग्रुप,जय बजरंग मित्र मंडळ,गंगादरवाजा मित्र मंडळ,जय बजरंग मित्र मंडळ, वडार समाज,शिवशक्ती मित्र मंडळ,जय भवानी मित्र मंडळ,नवजवान मित्र मंडळ,कासार युवा प्रतिष्ठाण, छत्रपती ग्रुप, धोंडीराम वस्ताद तालिम संघ, टक्कर फ्रेंड सर्कल, त्रिमुर्ती फ्रेंड सर्कल, बुंदेलपुरा तालिम संघ, लक्ष्मी नारायण मित्र मंडळ, मोदकेश्वर मित्र मंडळ, आझाद हिंद तरुण मित्र मंडळ, बिच्छू ग्रुप, न्यू तुफान फ्रेंड सर्कल, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ यासह विविध मंडळांना भेटी दिल्या.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, शहराध्यक्ष दीपक लोणारी, सुभाष गांगुर्डे, विकी बिवाल, सचिन सोनवणे, भाऊसाहेब धनवटे,पार्थ कासार,योगीता जगताप, अश्विनी जोशी, सीमा पवार, संगीता सोनवणे, सुनिल जाधव, श्रीकांत खंदारे, जयंत खांबेकर, राम तुपसाखरे, देवीदास दराडे, प्रतिक जाधव, संदिप वाडकर, अविनाश कुक्कर, रोहीत शहारे, दिपक सोनवणे, बली कुमावत, सचिन बाकळे, प्रल्हाद कवाडे, गोटू मांजरे, रुपेश लोणारी, संकेत पागे, नंदु नागपूरे, प्रसाद कासार, विशाल परदेशी, राजु लोणारी, ईश्वर शिंदे, अनिकेत बाबर, आकाश परदेशी, सचिन जाधव, संतोष परदेशी, पियुष पटेल, मयूर व्यवहारे, दयानंद जावळे, विकी गवळी, प्रशांत बटवाल यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.