*येवला तपोभूमीत अवतार लीला आत्मस्वरूपाची पारायण सांगता मोठ्या उत्साहात संपन्न*
येवला
दि. 4 सप्टेंबर 2025 रोजी येवला तपोभूमी सोमगिरी मठ येथे दि. 29 ऑगस्ट 2025 पासून 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत *आत्मस्वरूप अवतारलीला* या ग्रंथाचे पारायण करण्यात आले.
अवतारलीला आत्मस्वरूपाची ही निर्मिती अनंत कोटी ब्रम्हांडाचा नायक निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याच्या आदेशानुसार सकल भाविक भक्तांच्या आत्मकल्याणार्थ निर्माण करण्यात आलेली आहे. भाविकांची सर्व मनोरथे, संकल्प पूर्ण करणारी ही अवतारलीला संदेश रूपाने प्राप्त झालेली आत्म संजीवनी आहे. सदर ग्रंथाचे पारायण करण्यासाठी 108 भाविक भक्त, बंधू, भगिनी आज तपोभूमी येथे हजर होते. आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संतश्रेष्ठ श्री परमानंद महाराज यांनी आजच्या या आत्मस्वरूप अवतारलीला पारायणाच्या सांगता समारंभास उपस्थितांना सद्गुरु आत्मा मालिक माऊली यांच्यातर्फे खूप आशीर्वाद दिले.सदर कार्यक्रमासाठी आत्मा मालिक ध्यान योग मिशनच्या संत स्वरूपामाई, संत स्मृती माई, संत रामेश्वरी माई, संत दादा महाराज,संत अशोक महाराज,संत कंकाली महाराज असा संत परिवार उपस्थित होता.श्री विनूकाका राऊळ यांनी सदर पारायणाचे वाचन केले.सर्व संत आणि संत मातांचे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस, येवला व पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांनी सर्व संतांचे संतपूजन केले.
तसेच 1967 पासून येवला तपोभूमी येथे ध्यान साधना केली आणि 1987 मध्ये सद्गुरु माऊलींना अनंत चतुर्दशीच्या पावन मुहूर्तावर आत्मसाक्षात्कार झाला. आत्मा मालिक माऊली हाच संदेश देतात की सर्वांच्या हृदयामध्ये आत्मा नांदतो. हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ध्यान. आत्मा हेच जगातील एक परमसत्य आहे. येवला तपोभूमीत पारायण कालावधीमध्ये भाविक भक्त आणि शिक्षक यांचे मिळून 2168 पारायण झाले आहे.
सदर कार्यक्रमासाठी रायजादे, मांजरे, काथवटे,किराड,माळोकर, मगर, लांडगे,कुमावत,माळवे कट्यारे,गोरे इ.व सकल येवला सत्संग मंडळाच्या भाविक भक्तांचे,गुरुकुलाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.


