गणेश विसर्जनासाठी अहिल्यादेवी होळकर घाट व गणेश कुंड सज्ज – येवला नगरपरिषद कडून जोरदार तयारी
येवला :
शहरात गणेशोत्सवाचा उत्साह उंचीवर पोहोचला असून आगामी गणेश विसर्जन सोहळ्यासाठी येवला नगरपरिषदेकडून जोरदार तयारी सुरू आहे. अहिल्यादेवी होळकर घाट व गणेश कुंड येथे नागरिकांना विसर्जनाची सोय सुलभ व सुरक्षित व्हावी यासाठी नगरपरिषदेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
नगरपरिषद कर्मचारी व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने घाट परिसराची स्वच्छता, रस्त्यांवर प्रकाशयोजना, तसेच विसर्जनासाठी स्वतंत्र मार्गाची आखणी करण्यात आली आहे. गर्दी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनासह नगरपरिषद कर्मचारी सतत दक्ष राहणार आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी गणेश कुंडात विसर्जनाची सोय केली असून मूर्ती दानपेटी, नैवेद्य व फुलांसाठी स्वतंत्र डबे ठेवले गेले आहेत. तसेच, प्लास्टिक वापर टाळावा यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
येवला शहरात पाच ठिकाणी गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली असून यात गंगा दरवाजा पारेगाव रोड बदापूर रोड शनि पटांगण हे कृत्रिम तलाव ची व्यवस्था करण्यात आली आहे
मुख्याधिकारी तुषार आहे यांनी नागरिकांना स्वच्छता व शिस्त राखून गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. नगरपरिषदेकडून या पवित्र उत्सवासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आल्याने विसर्जन सोहळा सुरळीत पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


