*राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न....*
येवला:
15 सप्टेंबर रोजी नाशिक येथे शेतकरी बांधवांसाठी आक्रोश मोर्चाचे नियोजन बैठक तसेच येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृह येवला येथे पार पडली. आढावा बैठकीचे अध्यक्ष म्हणून नाशिक जिल्हा प्रभारी माजी आमदार सुनील भुसारा होते .तसेच जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील गोकुळ पिंगळे , विश्वजीत चव्हाण , ॲड .माणिकराव शिंदे हे उपस्थित होते.
प्रथम ॲड .माणिकराव शिंदे यांनी तालुक्यातील सर्व आढावा दिला .आक्रोश मोर्चाचे नियोजनासाठी तालुका दौरा करून मोठ्या संख्येने आम्ही नाशिक येथे उपस्थित राहू असे जिल्हा प्रभारी यांना आपल्या भाषणामध्ये सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा प्रभारी सुनील भुसारा यांनी कार्यकर्त्यांना मरगळ झटकून आगामी नगरपालिका , महानगरपालिका , जिल्हा परिषद , पंचायत समिती यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन केले. मी माजी मंत्र्याला पराभूत करून निवडून आलो होतो. त्यामुळे मंत्र्याला पाडणे काही फार अवघड नसते असा सूचक इशाराही दिला.आपण जनतेशी कशा पद्धतीने संपर्क साधायचा यासाठी मौलिक मार्गदर्शनही उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले. तसेच पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी होणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील केले.
आढावा बैठकीसाठी युवक प्रदेश उपाध्यक्ष शाहूराजे शिंदे , तालुकाध्यक्ष विठ्ठल शेलार , विधानसभा अध्यक्ष सुभाष निकम , महिला विधानसभा अध्यक्ष सौ नलिनी शिंदे पाटील , युवती तालुकाध्यक्ष कु.राणी शिंदे , येवला शहर युवक अध्यक्ष संकेत सोनवणे , विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष अमित शिंदे , शहर उपाध्यक्ष सागर पडवळ , राजेंद्र हिरे , साईनाथ मढवई , अजिज शेख , राजेश कदम , सुरेश कदम , नगरसेवक डॉ. संकेत शिंदे , नारायण मोरे , माजीद अन्सारी, निसारभाई निंबूवाले , दीपक लाठे , बाळासाहेब कसबे , प्रकाश होंडे , नवनाथ खोकले , सुनील देशमुख , प्रकाश पाचपुते , संजय मिस्तरी , अक्षय तांदळे , फिरोज शेख , काका वाणी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


