जनता बँकेची २९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न – श्री.अंबादास बनकर

 जनता बँकेची २९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न – श्री.अंबादास बनकर


येवला तालुक्यातील प्रमुख अर्थवाहिनी समजली जाणारी जनता सहकारी बँक लि. येवला बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्यंकटरावजी हिरे पतसंस्थेच्या सभागृहात बँकेचे संस्थापक चेअरमन श्री. अंबादास बालाजी बनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्याची माहिती बँकेचे व्हा. चेअरमन ओंकारेश्वर कलंत्री यांनी दिली.


प्रारंभी सभेचे अध्यक्ष तथा संस्थापक चेअरमन, व्हा.चेअरमन, व संचालक मंडळ तसेच जेष्ठ सभासदांनी सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित गुंजाळ यांनी सभेच्या कामकाजाची सुरुवात केली. बँकेचे चेअरमन मनोगतात बोलतांना बँकिग क्षेत्रात नागरी सहकारी बँकांनी फार मोलाची कामगिरी केलेली आहे. तंत्र ज्ञानावर होणारा प्रचंड खर्च, बँकांवरील दुहेरी नियंत्रण, एन.पी.ए., आयकराचा बोजा, मार्केटिंग, सायबर क्राईम, पेमेंट बँका, निधी जोखीम, मार्केट जोखीम इत्यादिचा परिणाम नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रावर झालेला आहे. या सर्व परीस्थितीवर आपले बँकेने मात करून ग्रामीण भागात अर्थव्यवस्था सुधारणेसाठी मदत केलेली आहे.


 आपल्या बँकेने ग्रामीण भागात अनेक समस्यांना सामोरे जाऊन प्रगती करत आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँकेचे संचालक मंडळ तसेच कर्मचारी वर्गाचे प्रयत्नाने बँकेस अ वर्ग मिळालेला आहे तर आपली बँक FSWM मध्ये असून बँकेची स्थिती मजबूत आहे.   

यावेळी चेअरमन बोलतांना म्हणाले की, बँक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून बँकेच्या एकूण ठेवी ७८ कोटी इतक्या आहे तर कर्जवाटप ४९ कोटी झालेले आहे. तसेच बँकेची गुंतवणूक ३८ कोटी असून राखीव निधी व इतर निधी ११ कोटी इतका आहे. ३१ मार्च २०२५ चा ढोबळ नफा २ कोटी ५ लाख इतका असून तरतुदी वजा जाता बँकेस निव्वळ नफा ६० लाख झाला आहे. बँकेचे सभासद कर्जदारांनी आपापल्या कर्जाचे व्याज व हप्ते वेळेवर भरून बँकेस सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.



यानंतर सभेच्या विषय पत्रिकेनुसार मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद, नफा तोटा पत्रकास मंजुरी देणे, नफा व त्याची वाटणी, दोष दुरुस्ती अहवालाचे वाचन, सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकास मंजुरी, वैधानिक लेखापरीक्षक नेमणूकीची कार्यात्तर मंजुरी, अंतर्गत लेखापरीक्षकांची नेमणूक करणे, आदी. विषयपत्रिकचे वाचन करण्यात आले. यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चेअरमन श्री.अंबादास बनकर व संचालक मंडळाने दिले. तसेच बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळ करत असलेले पारदर्शक कारभारासाठी उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे. सभासदांकडून कोणत्याही सूचना न आल्यामुळे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित गुंजाळ यांनी उपस्थित सर्व संचालक मंडळाचे व सभासदांचे आभार मानले. ऐनवेळीच्या विषयात कुठलेही विषय नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने व राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.



          याप्रसंगी बँकेचे चेअरमन अंबादास बनकर, व्हा.चेअरमन ओंकारेश्वर कलंत्री, माजी चेअरमन तथा सर्व श्री संचालक नंदकुमार अट्टल, अनिल कुमार पटेल, माधवराव बनकर, सोपानराव पवार, विनोद बनकर, अशोक कुळधर, कृष्णा जानराव, अशोक शिंदे, राधाकृष्ण कुऱ्हाडे, साहेबराव देशमाने, श्रीकांतसा बाकळे, किरण बनकर, गणपत पाटील, संचालिका जयश्री काळे, कविता लहरे, यांसह ज्येष्ठ सभासद रामेश्वर कलंत्री, रामेश्वर अट्टल, आशुतोष पटेल, माणिकराव वाघ, मधुकर शिंदे, सोपान सातपुते, कारभारी त्रिभुवन, आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. वार्षिक सभा यशस्वितेसाठी बँकेचे नंदकुमार काळे, संजय साताळकर, राजेंद्र वाबळे, रविंद्र जाधव, संजय बोराडे, भानुदास जाधव, अनिल वडनेरकर, पांडुरंग पवार, संदीप गायकवाड, अनिल गायकवाड आदी. कर्मचारी वर्गाने विशेष प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने