येवला तालुक्यातून मराठा बांधव मुंबईकडे ...
नगरसुल : (विनोद पाटील)
मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी येवला तालुक्यातील अनेक गावांमधून समाज बांधव मुंबईच्या दिशेने जात असून, आजही अनेक कार्यकर्ते मुंबईकडे शिधा घेऊन रवाना झाले.
रेंडाले येथील मराठा मोर्चाचे माधव बाबुराव आहेर,गणेश साहेबराव आहेर,प्रवीण नथू आहेर,संपत देवचंद आहेर, पोपट सूर्यभान आहेर,रामेश्वर कारभारी आहेर,नवनाथ रामचंद्र आहेर आदींसह मोठ्या संख्येने मुंबईस्थित असलेल्या लाखो लोकांपैकी सुमारे दोन हजार आंदोलनकर्ते यांच्यासाठी चटणी भाकर, भेळ भत्ता घेऊन नगरसुल रेल्वे स्टेशन येथून आज रेल्वेने रवाना झाले.