वयस्कर महिलांनी पैठणी दुकानदाराला घातला गंडा
दीड लाखाच्या सहा ते सात पैठण्या लपास
येवला :
येवल्यातील बुऱूड गल्लीत असलेल्या ‘सुरेखा पैठणी’ दुकानातून १ लाख ७० हजार रुपये किमतीची पैठणी साडी चोरून नेल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सोमवारी दुपारी बारा ते एक च्या दरम्यान पंकज तिवाणे आणि जितेंद्र कर्हेकर यांच्या मालकीच्या दुकानात दोन वयस्कर महिला ग्राहक बनून आल्या होत्या. त्यांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ही महागडी पैठणी चोरली. संपूर्ण घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात व पैठणी दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास सुरु आहे.