*येवला तालुक्यात 'सेवा पंधरवडा' मोहिमेचे आयोजन*
येवला तालुक्यात दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत' 'सेवा पंधरवडा' ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महसूल विभागाला अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि पारदर्शक बनवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या पंधरवड्याचे आयोजन तीन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिला टप्पामध्ये पाणंद रस्ते मोहीम, पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण, तालुक्यातील १२४ गावांमध्ये 'शिवार फेरी'चे आयोजन, निस्तार पत्रक तयार करणे, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी रस्ता अदालत आणि मॅपिंग करणे आधी कामे तर दुसरा टप्पा मध्ये 'सर्वांसाठी घर' योजनेअंतर्गत शासकीय जमिनींचे वाटप, अतिक्रमणांचे नियमितीकरण आणि पट्टेवाटप ही कामे होते व तिसरा टप्पामध्ये स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून जागेचा ताबा देणे, आयुष्मान कार्ड आणि रेशन कार्ड काढणे, स्वच्छता मोहीम राबवणे, तसेच पोटखराबा जमिनींचे ७/१२ वाटप करणे. असे नियोजन करण्यात आले आहे.
तहसीलदार आबा महाजन यांनी येवला तालुक्यातील नागरिकांना या 'सेवा पंधरवड्यात' सक्रिय सहभाग घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.