*सायगाव, पांजर वाडी साठी कोळगंगा नदीला डोंगरगाव कालव्याचे पाणी द्या :- सोनवणे यांची मागणी*

 *सायगाव, पांजर वाडी साठी कोळगंगा नदीला डोंगरगाव कालव्याचे पाणी द्या :- सोनवणे यांची मागणी* 

*धामणगाव ते पांजरवाडी चारी अव्यहार्य*

*पालखेड वितरिका 46 ते 52 आठमाहीसाठी प्रयत्न सुरूच :- सोनवणे*


येवला तालूक्यात धामणगाव ते पांजरवाडी अशा नव्या चारीचा कोणताही प्रस्ताव शासन दरबारी नाही, त्याबद्दल कोणताही पत्रव्यवहार जलसंपदा विभागात कडे कोणीही केलेला नाही, तशी मागणी कोणी केली तर संपूर्णपणे अव्यवहार्य ठरणार आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण मूळ प्रकल्प अहवालात नसलेल्या बाबीत कोणताही बदल करुन देत नाही.

शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी जी पाहणी झाली ती खाजगी पाहणी होती, तो कोणताही शासकीय सर्वे नव्हता, तसेच पाटापासून मागणी केलेला बंधारा 15 फूट उंचीवर आहे,  त्या साठी महागडी विद्युत पंपावर चालणारी लिफ्ट योजना उभारावी लागेल त्यामुळे धामणगाव ते पांजरवाडी चारी होणे शक्य नाही, असे स्पष्ट प्रतिपादन जल हक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

*पालखेड चे पाणी सायगाव ला देणे कोणत्याच निकषामध्ये बसणार नसल्याने डोंगरगाव कालव्याचे पाणी कोळगंगा नदीत सोडावे अशी मागणी जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी केली आहे.*

पालखेड वितरिका 46 ते 52 आठमाहीसाठी जलहक्क संघर्ष समिती लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठाम पणे उभी राहील असे ही सोनवणे यांनी म्हटले आहे.

धामणगाव- पांजरवाडी चारीच्या अफवे मुळे 46 ते 52 चारी वरील शेतकऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात चिंतेचे वातावरण पसरले होते. खामगाव, रास्ता सुरेगाव, बोकटे, दुगलगाव, गवंडगाव, देवठाण, भायखेडा आणि पूर्व अंदरसूल भागातील शेतकरी एकत्र येऊन आंदोलन उभारण्याच्या तयारीत होते, त्या साठी गावोगावी बैठका सुरु होत्या.

46 ते 52 वितरिका लाभ धारक शेयकऱ्यांनी चिंता सोडावी असे आवाहन जलहक्क संघर्ष समितीने चे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केले आहे. सोनवणे यांनी स्पष्ट केले की –

धामणगाव ते पांजरवाडी अशी कोणतीही चारी होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे वाट्याचे पाणी एक थेंबही कमी होणार नाही.

46 ते 52 वितरिका आठमाही करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ साहेब यांचा पाठपुरावा  सुरू आहे. याबाबत  मंत्री छगन भुजबळ साहेब यांचे विश्वासू सहकारी आणि राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस यांच्याशी संवाद साधून चारी होणार नसल्या चे आश्वासन  मिळाल्याचेही सोनवणे यांनी स्पष्ट केले.##########

"शासनाकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव विचाराधीन नाही.

फक्त काही शेतकऱ्यांनी जनता दरबारात मागणी केली होती, त्यानिमित्ताने झाली असलेली खाजगी पाहणी शासनाशी संबंधित नसून सर्वे मानण्यासारखी नाही.पाहणी मधून निष्पन्न झाले की पाणी १५ फूट उंचीवरून उचलावे लागेल, जे व्यवहार्य नाही.

लिफ्ट योजना करणे आर्थिक दृष्टिकोनातून शासकीय गणितात परवडणार नाही (अंदाजे १७ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता). लाभव्यय गुणोत्तर नकारात्मक असल्यामुळे ती योजना व्यवहार्य ठरणार नाही. अशी कोणतीही चारी होणार नाही

दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस


**********

46 ते 52 आठमाही साठी शेतकऱ्यांसोबत

***********

दमणगंगा एकदरे नदी जोडामुळे वाघाड प्रकल्पात अतिरिक्त पाण्याचा साठा निर्माण होणार असल्याने 46 ते 52 वितरिका आठमाही करणे अधिक सोपे होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यासाठी पाठपुरावा करत आहेत, या विषयावर जलहक्क संघर्ष समिती शेतकऱ्यांच्या सोबत काम करेल. 

:-  भागवतराव सोनवणे, 

संयोजक जलहक्क संघर्ष समिती, येवला

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने