*सेट परीक्षेत तन्मय नांदुर्डीकर याचे यश*..

 *सेट परीक्षेत तन्मय नांदुर्डीकर याचे यश*..


 


यंदाच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) मध्ये तन्मय नांदुर्डीकर याने उल्लेखनीय यश संपादन करून येवलेकरांचा आणि पालकांचा अभिमान वाढविला आहे. या परीक्षेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परिश्रम, चिकाटी आणि सातत्य यांची सांगड घालत उज्ज्वल यश मिळविले.

यावर्षी एकूण  साधारणपणे 90366  विद्यार्थ्यांनी SET परीक्षा दिली होती त्यात अवघे 6050 विद्यार्थी सदर परीक्षा उत्तीर्ण झाले व निकाल हा 6.69 टक्के लागून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यात तन्मय याने 208 गुण मिळवून उत्तीर्णतेचा मान मिळविला. या निकालामुळे चंद्रशेखर आगाशे  कॉलेज शैक्षणिक वातावरण, शिक्षकांचे मनोयोगपूर्वक मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची अभ्यासातील निष्ठा स्पष्टपणे दिसून येते.



SET परीक्षा ही राज्यातील उच्च शिक्षणासाठी महत्त्वाची पायरी मानली जाते. या परीक्षेत यशस्वी होणे म्हणजे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी भक्कम पाया मिळणे होय. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे यश हे केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण शाळा आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. सध्या तो चंद्रशेखर आगाशे कॉलेज येथे बी.पी.एड. पदवी पुर्ण करून एम.पी.एड. याचे शिक्षण पूर्ण करत आहे...


या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन, पालकांचे प्रोत्साहन, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध वातावरणाचा मोठा वाटा आहे.  विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करताना कॉलेजचे प्राचार्य यांनी सांगितले की, “तन्मय याने कठोर परिश्रम आणि चिकाटीने कॉलेजचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल.” पालकांनी देखील या निकालाबद्दल आनंद व्यक्त करत त्याच्या भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.अशा या उज्ज्वल यशामुळे येवल्याचा लौकिक अधिक वाढला असून भावी पिढीसाठी हे यश एक आदर्श ठरत आहे.


तन्मय हा नवभारत व नवचैतन्य क्रीडा मंडळाचा सदस्य असून यापूर्वी त्याने क्रीडा प्रकारात लॉन टेनिस स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर व सॉफ्टबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन केलेले आहे . तन्मय याचे प्राथमिक शिक्षण हे डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल व उच्च शिक्षण हे कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे झालेले आहे  तसेच तो येवल्यातील कला व वाणिज्य महाविद्यालय येथील सेवानिवृत्त क्रीडा संचालक श्री. शिरीष नांदुर्डीकर सर व विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ. राजश्री फडके यांचा चिरंजीव आहे. 


त्याच्या या यशाबद्दल येवल्यातील क्रीडा नगरीतून नवचैतन्य क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य नवभारत क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक, जनता विद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातून विविध मान्यवरांनी शुभेच्छा देऊन पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात..

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने