येवल्यात शिवसेना व भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश...

 

येवल्यात शिवसेना व भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश...

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश...

येवला : प्रतिनिधी






येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षात शेकडो पदाधिकाऱ्यांनी व माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे यात प्रामुख्याने राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना भाजप मधील काही पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केल्याने या प्रवेश सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे
नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून येवल्यात तळ ठोकून असून मंत्री छगन भुजबळ यांच्या गैरहजेरीमध्ये येवल्यात समीर भुजबळ हे संघटन मजबूत करत आहेत
शिवसेनेचे माजी नगरसेवक दयानंद जावळे, शिवसेना युबीटीचे ज्ञानेश्वर खैरमोडे, भाजपचे कुणाल भावसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सागर नाईकवाडे यांच्यासह अनेक प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला आहे



टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने