ममदापूर-रेंडाळे रस्त्याच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचा इशारा

येवला - ममदापूर-रेंडाळे या रस्त्याचे काम निकृष्ट झाले असल्याने या
कामाची वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाहणी करून सुधारणा करावी, अन्यथा उपोषणाचा
इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात ग्रामसभेत ठरावही करण्यात आला
आहे. रेंडाळे फाटा ते ममदापूरपर्यंत सुरू असलेले रस्त्याचे काम निकृष्ट
होत आहे. यामुळे या झालेल्या कामाची वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाहणी करून
कामाचा दर्जा सुधारण्यात यावा, अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा संतोष
आहेर, अशोक आहेर, दत्तू देवरे, नवनाथ आहेर, रामचंद्र आहेर, चांगदेव
थोरात, डॉ. अंकुश आहेर आदींनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने