लिंगायत समाजाचे स्मशानभुमी संरक्षण भिंतीचे भूमिपूजन


लिंगायत समाजाचे स्मशानभुमी संरक्षण भिंतीचे भूमिपूजन


येवला : प्रतिनिधी
 शहरातील लिंगायत समाजाचे स्मशानभूीचे संरक्षण भिंतीचे कामाचा भूमिपूजन सोहळा खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांचे हस्ते संपन्न झाला.  याप्रसंगी आमदार किशोर दराडे, नगराध्यक्ष बंडु क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, मुख्याधिकारी संगिता नांदुरकर आदी उपस्थित होते. 

येथील बदापुर रोड येथील लिंगायत समाजाचे स्मशानभूमीस संरक्षण भिंत बांधुन मिळावी यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासुन समाज बांधवांची मागणी होती.  सदर बाबत समाजबांधवांनी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांची भेट घेऊन निधी मंजुर केला.  त्यानुसार सदर कामाचा खासदारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.  याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा समाजाचे ज्येष्ठ सदस्य व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचे हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी रायभान काळे, नगरसेवक प्रमोद सस्कर, छाया देसाई, शितल शिंदे, पद्मा शिंदे, छाया क्षिरसागर, सरोजीनी वखारे, जयश्री गायकवाड, निता परदेशी, राजेंद्र लोणारी, आनंद शिंदे यांचेसह दिलीप तक्ते, नंदु जंग, सुरेश शेटे, अशोक तुपकरी, प्रमोद तक्ते, मिरा तक्ते, शुभा विभुते, स्नेहल शेटे, विजया साबरे आदींसह समाज बांधव उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने