सत्यगांव येथे श्रीराम कृष्णहरी मंदिरात २१००दिवांचे दीप प्रज्वलन

सत्यगांव येथे श्रीराम कृष्णहरी मंदिरात २१००दिवांचे दीप प्रज्वलन

येवला:. पुढारी वृत्तसेवा
सोमवार दि.२२जानेवारी आयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशभरातून श्रीरामांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने सत्यगांव‌ (ता.येवला)येथे श्रीराम कृष्णहरी मंदिरात रात्री ८ वाजता.ह.भ.प.रामायणाचार्य हरिदास महाराज सानप यांच्या संकल्पनेतून २१०० दिवांचे दीप प्रज्वलन करण्यात आले.दहा बाय वीस फुटाचे श्रीरामांचे नाव रंगीबेरंगी रांगोळीने रेखाटून श्रीरामांच्या नावावर दीप प्रज्वलन करण्यासाठी १०८ जोडप्यांना प्राधान्य देण्यात आले होते.
      तसेच येथील आदिवासी वस्तीवरील एकलव्य बांधवांनी श्रीराम कृष्णहरी मंदिर परिसराची दिवसभर स्वच्छता केली होती.तर दोन दिवसापासून मंदिरावर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाईने सजावट केली होती.या दीप प्रज्वलन कार्यक्रमासाठी गावातील तरुण एकत्र येऊन सहभागी झाले होते.या कार्यक्रमासाठी शेकडो महिला-पुरुष भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली होती.यानंतर प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने