शिक्षक मतदार संघ निवडणूकिसाठी तीन उमेदवारांकडून सहा नामनिर्देशनपत्रे सादर




 शिक्षक मतदार संघ निवडणूकिसाठी  तीन उमेदवारांकडून  सहा नामनिर्देशनपत्रे सादर



शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 ची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अधिसूचना 31 मे, 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे.शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी  दि. 3 जून, 2024 रोजी  3 उमेदवारांकडून 6 नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात आली आहेत.


यात राजेंद्र एकनाथराव विखेपाटील, मु. पो. लोणी बु. ता. राहता जि. अहमदनगर यांनी दोन नामनिर्देशन पत्र अपक्ष मधून  सादर केली आहेत. निशांत विश्वासराव रंधे, 7 ब-पित्रेश्वर कॉलनी  शिरपूर, ता. शिरपूर जिल्हा धुळे यांनी तीन नामनिर्देशन पत्र सादर केली असून दोन अपक्ष व एक भारतीय जनता पार्टी तुन नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. राजेंद्र दौलत निकम ,मु. पो. गुगळवाड ता. मालेगाव जि. नाशिक यांनी अपक्ष मधून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने