येवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने विविध क्षेत्रात पदे मिळालेल्या मान्यवरांचा सत्कार...
येवला व प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवा काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शाहू राजे शिंदे यांची भारत संचार निगम लिमिटेड तथा बी एस एन एल च्या नासिक ॲडव्हायझजरी कमिटीवर सदस्य म्हणून नेमणूक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांची पुणे डिव्हिजन रेल्वे बोर्डच्या डी आर यु सी सी सदस्य पदी नेमणूक तसेच येवला तालुका खरेदी विक्री संघ येथे सुनील देशमुख यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड झाल्याने व वाल्मीक सोपे यांच्या वाढदिवसा निमित्त आज एडवोकेट माणिकराव शिंदे यांच्या "रायगड"निवासस्थानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते .
त्याप्रसंगी योगेश सोनवणे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे उपाध्यक्ष एडवोकेट माणिकराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शाहू राजे शिंदे यांचा सत्कार संजय मिस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले व सुनील देशमुख यांचा सत्कार पंकज माळी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वाल्मीक सोपे यांचा सत्कार अरविंद भाई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी इजाज शेख, पंकज माळी, अरविंद भाई शिंदे, फिरोज शेख, सागर पडवळ, अन्सार शेख अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.