येवला नगरपरिषदेत आयुष्यमान भारत कार्ड मोफत कॅम्प

 येवला नगरपरिषदेत आयुष्यमान भारत कार्ड मोफत कॅम्प

येवला │ नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यासाठी येवला नगरपरिषदेत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प २२ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत नगरपरिषदेत भरविण्यात येणार आहे.

या कालावधीत येणाऱ्या पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळते. त्यामुळे मोठ्या आजारपणावर व उपचारांवर येणारा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचतो.

या कॅम्पमध्ये नागरिकांनी आधार कार्ड जो मोबाईल लिंक असेल तसेच रेशन कार्ड सोबत आणावे तसेच येवला नगरपरिषद येथे राष्ट्रीय नागरिक अभियान या कक्षाशी संपर्क करावे. येवला नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अधिकाधिक लोकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपले आयुष्यमान भारत कार्ड तयार करून घ्यावे.

तुषार आहेर , मुख्याधिकारी

येवला नगरपरिषद येवला 

👉 स्थान – येवला नगरपरिषद कार्यालय

👉 कालावधी – २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५

👉 सुविधा – आयुष्यमान भारत कार्ड मोफत



टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने