जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक
येवला :
आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.२३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
मंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या येवला येथील संपर्क कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर व प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार हे पक्ष कामकाजाचा जिल्हा परिषद गटनिहाय आढावा घेणार आहेत.
या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक धोरण, पक्षाची भूमिका, कार्यकर्त्यांची जबाबदारी व निवडणूक लढवण्यासाठीची रणनीती यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मंगळवार दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी १.०० वाजता या बैठकीस येवला तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, मंत्री ना.छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी केले आहे.