6 वर्षाची मुलगी ठार..नगर मनमाड महामार्ग बनला मृत्यूचा सापळा....

 नगर मनमाड महामार्ग बनला मृत्यूचा सापळा....

येवला तालुक्यात दोन विविध अपघातामध्ये एका चिमुरडी सह एक जण ठार ....

अधिक माहितीसाठी व्हिडिओ लिंक बातमीच्या शेवटी पहा...


अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद...

नगर- मनमाड महामार्ग हा मृत्यूचा सापळा होतोय की का..?हा सवाल निर्माण झाला आहे परवा आज पाच तारीख आहे दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रात्री दुचाकीला धडक दिल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता 

दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री धानोरे येथील मोठा मारुती जवळ पायी चालणाऱ्या एका तरुणाला वाहनाने धडक दिली आहे त्यात गणेश घीरे वय 31 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला 

त्यानंतर दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी फत्तेबुरुज नाका भागात दुसरा अपघात झाला. यात दुचाकीवरून जात असलेले देविदास शेळके व 55 व त्यांची नात जयश्री शेळके वय 6 यांना एका पेट्रोल टॅंकरनं धडक दिली यात जयश्री शेळके चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आजोबा देविदास शेळके हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .


नगर मनमाड रस्ता बनला मृत्यूचा सापळा

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने