नगरसूलकरांनी वाचविले जखमी काळविटाचे प्राण

नगरसूल येथील सहा नंबर रेल्वेगेट जवळ असलेल्या जेजूरकर यांच्या मळ्यात सकाळी 7 वाजता मयूर जेजूरकर, रवींद्र जेजूरकर या दोघांना शेतात काळवीटाला कुर्त्यांनी जखमी केल्याचे दिसले. त्यांनी लागलीच वन्यप्रेमी कैलास जेजूरकर यांना कळविले. त्यांनी कुर्त्यांच्या तावडीतून त्याची सुटका करून वनविभाग संपर्क साधला. तसेच येवला येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. यावेळी वनमजुर विलास बागूल, विठ्ठल शेजवळ त्यांच्या समवेत होते.

जखमी काळविटाची प्रकृती सुधारल्यावर राजापूर (ता.येवला) येथील वनक्षेत्रात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. यावेळी सुनील पैठणकर, जिल्हा परिषद सदस्य साईनाथ मोरे, विजय पैठणकर, कोंडाजी जेजूरकर, गणपत पैठणकर यांसह ग्रामस्थ मदतीसाठी उपस्थित होते. या ना त्या कारणाने हरणे, काळवीट वन्यप्राणी हे जखमी होत असतात. पण वनविभागाकडे कुठलीही ठोस यंत्रणा नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
थोडे नवीन जरा जुने