येवला - येथील पंचायत समिती कार्यालयातर्फे रमाई आवास 
योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या घरकुल योजनेतील 398 लाभार्थ्यांना प्रत्येकी
 2 ब्लॅँकेट व 2 सतरंजी असे साहित्य सभापती व सदस्यांच्या हस्ते वाटप 
करण्यात आले. याप्रसंगी सभापती राधाबाई कळमकर, उपसभापती हरिभाऊ जगताप, 
सदस्य संभाजी पवार, रतन बोरणारे, प्रकाश वाघ, शिवांगी पवार, भारती सोनवणे, 
जयश्री बावचे, गटविकास अधिकारी अजय जोशी व लाभार्थी उपस्थित होते.