येवला पालिकेअंतर्गत बचत गटांचा शिरपूर अभ्यास दौरा

येवला  - येवले नगरपरिषद अंतर्गत सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत प्रेरणा समाज विकास संस्थेच्या बचत गटातील महिलांना शिरपूर पालिकेच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या महिला बचत गटांच्या विविध व्यवसायांचा अभ्यास जाणून घेण्यासाठी येवल्याचे नगराध्यक्ष नीलेश पटेल, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगरसेवक प्रदीप सोनवणे, रवी जगताप व बचत गटाच्या महिलांनी भेट दिली. भामरे, समूह संघटक रा वामखेडकर व प्रमोद आहिरे यांनी त्यांच्या समाज विकास संस्थेच्या माध्यमातून बचत गटाच्या व्यवसायाची माहिती दिली. पीठाची गिरणी, कटलरी विक्री, पापड गिरणी, दूग्ध व्यवसाय, मेस, बांगडी तयार करणे, धान्य दुकान, सोयाबीन पदार्थ, रेडिमेड व्यवसाय, पापड, वेफर्स आदी वेगवेगळ्या बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू असल्याची माहिती दिली, तसेच पालिकेच्या फील्टर प्लॅन्ट व टेक्सटाईल मिल यांनाही भेट दिली. महिलांना रोजगारासाठी अनेक व्यवसाय मिळाल्याने त्या स्वावलंबी झालेल्या आहेत असे सांगितले. या दौर्‍यातून येवले शहरातील महिला बचत गटांनी सुद्धा व्यवसाय चालवून चांगली बाजारपेठ उपलब्ध करावी याकामी योजना राबविल्या जातील असे नगराध्यक्ष पटेल व मुख्याधिकारी मेनकर यांनी सांगितले. अशोक कसारे, विखे, श्रीमती भारोटे, मिनाबाई शिंदे, राजश्री राऊत आदी दौर्‍यात उपस्थित होत्या.
थोडे नवीन जरा जुने