येवला-भारम रस्त्यावरील घटना .........टेम्पो-मोटारसायकल अपघातात एक ठार

येवला - येवला-भारम रस्त्यावर नागडे रेल्वे चौकीजवळ टेम्पो व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला.आज दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास येवल्यावरून भारमकडे जाणारी मोटारसायकल (क्र. एमएच 15 अेडी 6081) आणि भारमकडून येवल्याकडे येणारा टेम्पो (क्र. एमएच 16 बी 5693) यांच्यात समोरा समोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. त्यात मोटारसायकलस्वार अंकुश किसन मोहन (वय 39, रा. डोंगरगाव, ता. येवला) हे जागीच ठार झाले. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला आहे. येवला पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला असून, टेम्पोचालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पो. उपनिरीक्षक पांडुरंग खेडके, पोलीस नाईक वसंत हेबांडे, पो. कॉन्स्टेबल शिवा शिंदे, पोलीस नाईक संजय भुसाळ करीत आहेत
थोडे नवीन जरा जुने