येवला - तालुका कृषी अधिकारी व बियाणे विक्रेत्यांच्या
संगनमताने चढ्या दराने बियाण्यांची विक्री करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार
केल्याप्रकरणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने दिलेल्या उपोषणाच्या इशार्यावरून
जिल्हा कृषी अधिकार्यांनी तालुक्यातील २० कृषी सेवा केंद्रांना २५ फेब्रुवारी
रोजी सुनावणीसाठी नोटिसा बजाविल्या आहेत.
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय सोमासे यांनी आमरण उपोषणाचा इशारा तालुका कृषी अधिकार्यांना दिला होता. जीवनावश्यक वस्तू विक्री कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी छावाने केली असता जिल्हा कृषी अधिकारी डी.आर.बोराडे यांनी छावाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय सोमासे, निफाडचे विभागीय कृषी अधिकारी हेमंत काळे, तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर, कृषी अधिकारी डी.आर.सोनकुसळे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आली. जिल्हा कृषी अधिकारी डी.आर.बोराडे यांनी शहरासह तालुक्यातील २० कृषी सेवा केंद्रांना १४ फेब्रुवारी रोजी लेखी नोटिसा दिल्या आहेत. यात व्यंकटेश सीडस् (येवला), जय योगेश्वर कृषी सेवा केंद्र (उंदीरवाडी), अजित कृषी भांडार (येवला), महेश सीडस् (येवला), कृष्णा ऍग्रो सर्व्हिसेस (येवला), नंदा सीडस् (येवला), एकनाथ खेमचंद ऍग्रो (येवला), देसाई ऍग्रो सेंटर (येवला), श्री कृषी सेवा (येवला), साई समर्थ कृषी सेवा केंद्र (येवला), सद्गुरू कृषी सेवा (अंदरसूल), वज्रेश्वरी शेतकरी विकास सह.संस्था (नेऊरगाव), माऊली ट्रेडर्स (नगरसूल), श्रीराम कृषी सेवा केंद्र (येवला), एम.बी.ऍग्रो (भारम), तुळजाई कृषी सेवा केंद्र (येवला), ओम गुरूदेव कृषी सेवा केंद्र (नगरसूल) आदींचा समावेश आहे.