येवल्यात दिवसा घरफोडी; १४ तोळ्यांचे दागिने लंपास

 येवला  - विंचूर रोडवरील पटेल कॉलनी येथील शैलेश शंकरराव आहेर यांचा घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील १४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली. भरदिवसा चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शैलेश आहेर हे पटेल कॉलनीत राहतात. ते कामानिमित्त सकाळी बाहेर पडले, तर पत्नी पंचायत समितीमध्ये नोकरीस असल्याने मिटिंगनिमित्त बाहेर गेल्या होत्या. दुपारी १ वाजता घरी आल्यानंतर घराचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला, तर कुलूप शेजारील कचरा कुंडीत पडलेले आढळून आले.

घरात प्रवेश करून खात्री केली असता बेडरुममधील कपाट उघडे होते, तसेच सामान अस्तव्यस्थ पडलेले होते. ही घटना पतीला फोनवरून सांगितली व घरी बोलावून घेतले. दोघांनी घरातील सामानांची खात्री केली असता पलंगावरील गादीखाली ठेवलेल्या चावीने कपाटाची उघडून लॉकरमधील कॅरीबॅगमध्ये ठेवलेले ५ तोळे सोन्याच्या चपला हार, २ पाटली, कानातील रींग जोड, १ नथ, १ नेकलेस असा एकूण चौदा तोळे सोने, तीन लाख ६२ हजार ५00 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास एपीआय पांडुरंग खेडकर, पो. ना. सांगळे, पो.ना. ठाकूर, आहेर, पगारे, शिंदे आदी करीत आहेत.
थोडे नवीन जरा जुने